शेळगाव १० मे येथील ग्रामपंचायत उपसरपंच कै. मच्छिंद्र महादेव भोंग यांचे काही महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. यामुळे शेळगाव ग्रामपंचायत या ठिकाणी सदस्य पदाची एक जागा रिक्त झाली होती.या पोट निवडणुकीत कै. मच्छिंद्र महादेव भोंग यांचे बंधू अशोक महादेव भोंग यांची सदस्य पदी बिनविरोध निवड झाली.निवडणूक अधिकारी म्हणून श्री. एस. डी राखूडे मंडळ अधिकारी यांनी काम पाहिले.
बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाले बद्दल सरपंच रामदास शिंगाडे, उपसरपंच चंद्रकांत राऊत, सर्व सदस्य, मार्गदर्शक व छत्रपती सह.साखर कारखान्याचे संचालक ॲड.लक्ष्मणराव शिंगाडे यांनी भोंग यांचे अभिनंदन केले.सर्व सामान्य माणसापर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना पोहोचवण्यासाठी व कै.मच्छिंद्र भोंग यांचे अपूर्ण कार्यपूर्तीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया निवडीनंतर भोंग यांनी दिली.