मुक्ताबाई विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सौ.रूपाली माने यांची साहाय्यक अभियंता पदी निवड !!

 



   (किरण माने इंदापूर प्रतिनिधी)

      शेळगाव १ मे २०२३ रोजी रयत शिक्षण संस्थेचे श्री संत मुक्ताबाई विद्यालय या ठिकाणी ६४ वा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य भागवत भाऊ भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, व राष्ट्रध्वजाला मानवंदना  देण्यात आली.

           या कार्यक्रमाचे औचित्य साधून  नुकत्याच झालेल्या एम.पी.एस.सी. परीक्षा मार्फत जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत सहाय्यक अभियंता श्रेणी २ (class 2 officer) या पदी राज्यामध्ये DT-A महिला या प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक आलेली श्री संत मुक्ताबाई विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सौ रूपाली बजरंग माने तसेच नुकत्याच  झालेल्या पोलीस भरतीमध्ये कु. प्रगती चव्हाण हिची ठाणे या ठिकाणी पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल,

यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ स्कूल कमिटी सदस्य साहेबराव भाऊ शिंगाडे व भागवत भाऊ भुजबळ, मुख्याध्यापक भारत कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला...

       या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य साहेबराव भाऊ शिंगाडे,भागवत भाऊ भुजबळ, मुख्याध्यापक भारत कांबळे, पर्यवेक्षक  रमेश लोंढे, वैभव भोंग सर,सहाय्यक अभियंता प्रशांत माने, गुरुकुल प्रमुख विजय पवार सर, किशोर भोसले सर , धनंजय मोरे सर , सुनील शिंगाडे, बजरंग शामराव माने, दिलीप जयसिंग जाधव, महेश जाधव,आप्पा हगारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अजिनाथ मारकड सर यांनी मांडले.