यशवंत विद्यालयात कामगार दिन उत्साहात साजरा.


      प्रतिनिधी : भिमराव कांबळे

 येथील यशवंत विद्यालयात महाराष्ट्राचा स्थापना दिवस आणि कामगार दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सकाळी प्राचार्य व्ही. व्ही.गंपले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पाचवी ते नववी विद्यार्थ्यांचा शालेय निकाल घोषित करून विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

     यावेळी डॉक्टर अशोक सांगवीकर यांचे विद्यार्थ्यांच्या जीवनावर मार्गदर्शन करणारे भाषण झाले.या समयी उपप्राचार्य जी एस घोरबांड, उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, परवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, खय्युम शेख,राम तत्तापुरे, सोमनाथ स्वामी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.