मलकापूर येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव मोठ्‌या थाटात संपन्न


मलकापूर हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८३ वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप सिंहसार्वजनिक जन्मोत्सव समिती, सकल राजपूत समाज मलकापूर यांच्याकडून दिनांक २२ मे रोजी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव मलकापूर बाहर येथे आयोजित करण्यात आला होता. या जयंती निमित्ताने हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदविला होता, यानिमित्ताने भव्य मोटार सायकल रैली शहरातील प्रमुख महामार्गावरून काढून महामानवांच्या पुतळयांना मानवंदना करून गाळेगाव येथे समारोप करण्यात आले. तसेच दुपारी ४.०० वाजता शहरातील सार्वजनिक वाचनालय मैदान येथून महाराणा प्रतापसिंह यांची शोभायात्रेचे सुरुवात करून शहरातील मुख्य रस्त्यांवरून हजारोंच्या संख्येने नाचत गाजत मार्गक्रमन करत शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारक स्थळी हीर सभा समारोप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिसरातील राजपूत समाजसह वेगवेगळ्या जाती धर्मीचे बांधव हजारोंच्या संख्येने या महोत्सवात सामील झाले होते. यावेळी पारंपरिक पारंपारिक वेशभूषा केलेले समाज बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले. या शोभायात्रेत पारंपारिक वाद व हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा विराजमान करण्यात आला. तसेच चि. रोनित मुजब यांनी हिंदू महाराणा प्रतापसिंह यांची वेशभूषा साकारून शोभायात्रेत सहभाग घेऊन सवल वेधून घेतले. महाबली हनुमान यांची जिवंत प्रतिरूपी देखावा यावेळी या शोभायात्रेतून सादर करण्यात आला तर विशेष म्हणजे या शोभायात्रेत वाळवंटातील जहाज म्हणून ओळखल्या जाणार या उंट ही सहभागी करण्यात आले होते या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सदर जयंती महोत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला

शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त वाहतूक सुरळीत... 

शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता ठिकठिकाणी शहर पोलिसांच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर वाहतूक शाखेच्या वतीने शहरात वाहतूक सुरळीत सुरू राहावी याकरिता प्रयत्न सुरू होते..