आकाश साळुंके
सटाणा दि.20: - तालुक्यातील आस्मानी संकट गारपीट मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक पगार यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेनाद्वारे केली आहे
तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी दि.17 रोजी सटाणा तहसील कार्यालयात ठिया आंदोलन केले होते सदर आंदोलन मंत्री दादाजी भुसे यांनी भ्रमण ध्वनी वर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकऱ्यांना बैठकीचे निमंत्रण दिले असता त्यांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आले होते.लाल कांद्याप्रमाने उन्हाळी कांद्यास प्रती क्विंटल ५००रू अनुदान जाहीर करावे व त्याचा कालखंड जोपर्यंत कांद्याचे दर सुधारत नाही तोपर्यंत ठेवावा तसेच चालू वर्षी सदर पिकासाठी वापरलेले विद्युत बील शासनाने विद्युत कंपनीस भरणा करून द्यावा असे विविध मागणी चे निवेदन पालक मंत्री यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले
या संदर्भात दोन ते तीन दिवसात कृषी मंत्री,उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या बरोबर मिटिंग घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी दिले याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे भास्कर सोनवणे ,केदा पगार ,मधुकर कापडणीस ,प्रवीण आहिरे,संजय वाघ,के.पी.कापडणीस,निलेश सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.