वाढत्या तापमानामुळे बाजारपेठा थंडावल्या..


                            कुलिंग चार्जच्या नावाखाली नागरिकांना सोसावी लागतेय झळ...

तालुका 

दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असून सध्या सूर्य आग ओकू पाहत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ देखील सुस्तावलेली आहे. अंग भाजणाऱ्या उन्हामुळे शहरवासी सकाळी १०-११ वाजेपर्यंत बाजारपेठेतील कामे आटोपण्याला प्राधान्य देत आहेत.

 त्यामुळे वाढत्या उन्हाचा बाजारपेठेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते.उन्हापासून बचावासाठी नागरिक डोक्यावर टोपी किंवा गमजा तर महिला दुप्पटा व स्टॉल बांधूनच घराबाहेर पडत आहेत. जीवाची लाही लाही करणारे ऊन सध्या असल्याने दुपारच्या वेळी रस्तेही सुनसान दिसत आहेत.

 तर मुके प्राणीही झाडाच्या सावलीचा आसरा घेताना दिसत आहेत वृक्षाच्या सावलीत ही जनावरे बसून उन्हापासून आपला बचाव करीत असल्याचे बघावयास मिळत आहेत. परंतु सध्या पाहिजे त्या प्रमाणात शहरात वृक्ष नसल्याने वृक्षारोपण मोहिम हाती घेण्याची गरज आहे. शहरात ठिकठिकाणी सध्या थंड पेय व साहित्याची दुकाने लागली आहेत. वाढत्या गर्मीपासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून अनेकांनी ऐरवी बंद राहणारे कुलर सध्या सुरु केले आहेत. मात्र, मुक्या प्राण्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

                                कुलिंग चार्ज च्या नावाखाली उकळले जातात पैसे..

कळंब शहरातील वाढते तापमान व अंगाची लाही लाही होत असताना नागरिक थंडपेयाच्या दुकानात जात असून त्यांच्या खिशाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे कारण  दुकानदार कोल्ड्रिंक्स ला थंड करण्याच्या नावाखाली छापील किंमतीपेक्षा पाच ते दहा रुपये जास्त आकारत असल्याचे दिसून येत आहे..

        आम्ही मुलांसोबत एका थंडपेयाच्या दुकाने गेलो असता आम्ही एक थंडपेय घेतले व त्याचे दहा रुपये आम्हाला जास्त लावला असता आणि विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कूलिंग चार्ज द्यावाच लागेल घ्यायचे असेल तर घ्या अन्यथा घेऊ नका... लखन जाधव..नागरिक