प्रतिनिधी साहिल खान
लोणार:-मौजे टिटवी जंगलात वन विभागाचे काम झाले असून झालेले काम हे इस्टीमेंट नुसार करण्यात आले नसल्याची तक्रार भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन कोकाटे यांनी वन संरक्षण अधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की वन विभागामार्फत झालेल्या तलावाच्या पायामध्ये काळी मातीचा वापर करण्यात आलेला नाही तलावाची लांबी रुंदी व उंची पाहिजे तेवढी नाही तलावाचे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मशीनचा वापर केल्याचा निवेदनात म्हटले आहे. तलावाचे काम योग्यरीत्या न केल्यामुळे जंगलात राहणाऱ्या वन प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते व जंगलात शेजारील शेतकऱ्यांना वन प्राण्यांचा त्रास होतो.अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता त्यांच्या कडून उडवा उडवी उत्तर दिले जाते.तरी पण स्वतः या कामाची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.