प्रतिनिधी साक्री संजय बच्छाव
मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी .अवकाळी, दुष्काळी ,अनुदान तसेच घरकुला सह इतर शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्ज खात्यात जमा करू नये असे निवेदन भाजप किसान मोर्चा तर्फे तहसीलदार श्री नितेश कुमार देवरे यांना देण्यात आले.
काल भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री बिंदू शेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व पदाधिकारी यांनी तहसीलदार नितेश कुमार देवरे यांची भेट घेतली .शासकीय अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करू नये अशी मागणी केली. शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्माननिधी अवकाळी पाऊस दुष्काळी घरकुलाचे अशा इतर शासकीय योजना सह अनुदान मिळत असतात. मात्र संबंधित बँक अधिकारी त्यांच्या अकाउंटला होल्ड लावून ठेवत असल्याकारणाने शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावता येत नाही मात्र शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बँक अधिकारी मनमानी कारभार करत असतात म्हणून शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत याची गंभीर दखल घेत संबंधित बँक अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना करण्यात यावी अशी मागणी शेतकरी मित्र श्री बिंदू शेठ शर्मा यांनी केली.