अखिल भारतीय श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तसेच दिंडोरी प्रणित, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विवेकानंद नगर अमृतधाम या केंद्रामध्ये आज दि,7/05/2023 रोजी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने तसेच गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय बालसंस्कार उन्हाळी शिबिर, सध्याचे वातावरण बघता सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात आले.
याप्रसंगी पंचवटी विभागातील विवेकानंद नगर केंद्र, स्वामी समर्थ नगर जत्रा हॉटेल केंद्र, सय्यद पिपंरी, आडगाव, हिरावाडी, जनार्दन नगर, बालाजी कोट या सर्व केंद्रामधील बालगोपाल या शिबिरात सहभागी झाले होते, शिबिरामध्ये अध्यात्मिक मंत्र, स्तोत्र,तसेच चित्रकला वक्तृत्व व सिड बॉल तयार करून पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल या अशा अनेक उपक्रमानी शिबीर आनंदात व उत्साहात पार पडले. या प्रसंगी घोडेराव काका, मधुकर पगार, माधव काकड, हंडोरे काका, अक्षय निकम तसेच भुसारे ताई.सुनिता काकड, प्रणिता पाटील, व राजश्री घोरपडे आदी सेवेकरी उपस्तिथ होते.