प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी,
श्रीरामपूर शहरातील वाड नंबर 2 या परिसरात संजय नगर या ठिकाणी दाखवा मज्जिद जवळील एका बंद घरात आरोपी शोएब अकबर शेख नावाचा इसम सुगंधित गुटखा खरा तयार करून त्याची चोरटी विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी मिळाली असतात यांनी तात्काळ पोलीस पथक रवाना करून माहिती घेतली असता तपास पदकांनी आरोपीला शोएब शेख यास ७८ हजार रुपये किमतीचे ५ किलो वजनी २६ सुगंधित गुटखा ख् यांच्या पिशव्या १ लाख रुपये किमतीचे सुगंधित गुटखा बनवायची लोखंडी मशीन व ५० हजार रुपये किमतीचे MH16AN7087 एच एफ डिलक्स मोटर सायकल आशा एकूण २ लाख २८ हजारांचा मुद्देमाल सह ताब्यात घेतले असून आरोपी शोएब शेख यांच्या विरोधात,भादंवि कलम ३२८,८८,२७२,२७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दादाभाई मगरे पोलीस नाईक रघुवीर कारखेले भैरव आढागळे, अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे शिवाजी बडे, मच्छिंद्र कातळकडे, गौतम लगड, गणेश गावडे, आणि रमिझ आत्तार आदीच्या पथकाने यशस्वी कामगिरी पार पाडली