आदर्श माध्यमिक विद्यालय, कावनाई 1 मे महाराष्ट्र दिन साजरा

   


प्रतिनिधी  रावसाहेब पगार

      आजच्या  कार्यक्रमात मुंबई   येथील उद्योजक अमितजी  गाला साहेब यांचे ग्रुप च्या वतीने विद्यालय विज्ञान प्रयोग शाळे करिता प्रयोग साहित्य, फर्निचर भेट देण्यात आले. प्रयोग शाळा उद्घाटन कावनाई सरपंच सौ.सुनिताताई गोपाळ पाटील, निवृत्तीभाऊ पाटील, वाळू पाटील,शाळा समिती,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी  यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.   तसेच किल्ले कावनाई ग्रुप च्या वतीने  वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड,पेन व प्रमाणपत्र  देण्यात आले. धन्यवाद ...गाला साहेब.  किल्ले कावनाई ग्रुप व  धन्यवाद माजी विद्यार्थी ग्रुप.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.