सूर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
तालुक्यात विशेषतः खाडीपट्टा विभागात वाळू माफीयांची दहशत दिवसेंदिवस वाढतच असल्याचे समोर आले आहे. बुधवारी पाहणी करण्यास गेलेल्या महसूलच्या वरिष्ट अधाकार्यासह गाव कामगार तलाठी यांना दमदाटी केल्याचा प्रकार घडल्याने या वाळू माफीयांना वरदहस्त राजकिय कि शासकिय ? असा सवाल तालुकावासियांमधून विचारला जात आहे.
सद्या वाळू माफियांचे राज आहे की काय असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.कारण आज चक्क एका वाळू माफियाने आपल्या कामावर असण्याला अधिकाराला व त्याच्या हाताखालील गावाचे प्रतिनिधीत्व करण्याला तलाठी ला दमदाटी करण्यात आली असल्याचे समजते.खरं तर शासनाचा लाखोंचा महसूल बुडून निसर्गाचे सोने लूटणार्वयांना वरदहस्त कोणाचा आहे असा सवाल उपस्थित केला जातो .शासनाचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारीवर्गा वर वाळू माफिया दमदाटी करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय.. असा ही सवाल विचारला जातो.
हल्ली ग्रामीण भागातून खुले आम वाळू चे चार चाकी दप्पर भरधाव वेगाने रस्त्यावरून धावत असतात.त्यावर अकुंश कोणाचा ? नदी किनारी अनेक वेळा वाळूचे ढिग दिसतात ते कोणाच्या परवानगीने काढले जातात? या गोष्टी ची विचारणा केली गेली तर त्या अधिकार्याला दमदाटी केली जाते ??आणि हे सारे नक्की कोणाच्या आशीर्वाद ने होते.नक्की या वाळू माफियांना लोकप्रतिनिधी आपल्या पदराखाली लपवतात की चोरटी वाळू विकून हे मुजोर ठेकेदार आपल्या तालावर आपल्या मनामप्रमाणे वागवतात हेच कळत नाही.
पण दिवस दिवस शासकीय अधिकारावर वाळू माफियांचे मुजोर गिरी वाढत असल्याचे चित्र बघायला मिळते यावर चाफ बसतो की नाही . मुजोर वाळू माफियावर काय क्रारवाई होणार .तो प्रामाणिक अधिकारी आत्ता आपली भूमिका काय मांडतो .आणि खाड्डी पट्ट्यात आपली दहशत पसरवणारा हा वाळू माफिया नक्की कोण ?अशी चर्चा सध्या खेड तालुक्यात नाक्या नाक्यावर एकू येत आहे.