उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी ; नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी." |
किरण माने इंदापूर प्रतिनिधी
शेळगाव {तालुका इंदापूर} येथील गौराई मळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील इयत्ता १ चा प्रवेश कार्यक्रम तसेच इयत्ता ४ च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छांचा कार्यक्रम साजरा झाला..
यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे उपस्थित होते.ते भाषणात म्हणाले,की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच लहान मुलांचा विद्यार्थ्यांचा पाया भरला जातो, जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होतो असेही पुढे विक्रम साळुंखे म्हणाले.
तसेच शाळेची कमान व भिंतीवरील रंग रुंगोटीसाठी 70 हजार रुपयांचा निधी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव,अरुण जाधव, श्वेता भोसले, प्रियंका जाधव, प्रदीप खरात,तात्यासाहेब शिंगाडे,दीपक शिंगाडे, विनोद नाझरकर यांनी दिला.या कार्यक्रमासाठी सरपंच रामदास शिंगाडे,केंद्रप्रमुख मारुती सुपुते,अरुण जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास शिंगाडे,हवालदार विनोद पवार, अमोल जाधव, पोपट शिंगाडे, मनीषा जाधव,मनीषा शिंगाडे,रंजना बनसोडे, सेविका सुनीता जाधव, कल्पना जाधव,
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रताप शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक उमेश सुपुते यांनी केले, तर शिक्षका जुबेदा पठाण यांनी आभार मानले.