इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मतदान पार



किरण माने इंदापूर प्रतिनिधी

     शेळगाव २८ एप्रिल २०२३ रोजी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागांपैकी बिनविरोध झालेल्या ४ जागा वगळता उर्वरित १८ जागांसाठी शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले १४ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. शेळगाव बूथ यामध्ये शेळगाव,घोरपडवाडी, कडबनवाडी,दगडवाडी, निरवांगी,शिरसाटवाडी,हागारेवाडी,निमसाखर ,रणगाव,सराफवाडी  एकूण १० गावांचा समावेश होता. त्यामध्ये ३५७ मतदार होते.

     शेळगाव या ठिकाणी शुक्रवार २८ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते साहेबराव भाऊ शिंगाडे, ॲड लक्ष्मणरावजी शिंगाडे ,सरपंच रामदास शिंगाडे,अंबादास शिंगाडे, प्रतापसिंह  चवरे, शब्बीर भाई सय्यद, कडबनवाडी चे सरपंच दादासाहेब जाधव, तसेच ग्रामपंचायत ,सर्व सदस्य सोसायटीच्या सर्व संचालकांनी व महिलांनी जेष्ठ नागरिकांनी संविधानाने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसले.              

    शेळगाव या ठिकाणी मतदान केंद्राला माजी राज्यमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे तसेच मोहोळचे आमदार यशवंत माने व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रम साळुंखे यांनी मतदान केंद्राल भेटी दिल्या.

    इंदापूर बाजार समितीसाठी एकूण ८ हजार ३२२ मतदार मतदानासाठी पात्र असून,यामध्ये २५० सोसायटीच्या सोसायटी मतदारसंघातून ३ हजार १३१ मतदार तर ११६ ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत मतदार संघातून १हजार१९१ मतदार आहेत. मतदार राजा कोणाच्या पाठीशी उभा आहे हे उद्या शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ ला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सायंकाळी ४ वाजे पर्यंत ग्रामपंचायत मतदारसंघ १०५ पैकी१००(९५.२६%) आणि सोसायटी मतदारसंघ २५२पैकी२४८(९८.४१%) मतदान झाले.

    यावेळी शेळगाव मतदान केंद्रवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहिला मिळाला.