प्रतिनिधी साक्री संजय बच्छाव
श्री सोमेश्वर कृषी मार्केट दहिवेल आज दिनांक 1 मे रोजी श्री सोमेश्वर कृषी मार्केट येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले व कामगार दिनानिमित्त सर्व हमाल व कामगार यांचा सत्कार श्री सोमेश्वर कृषी मार्केटचे संचालक श्री मनोज भाऊ चौधरी यांनी सर्व कामगारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्यावेळी सर्व दहिवेल गावातील कांदा व्यापारी उपस्थित होते. त्यावेळी सर्व व्यापारी व कामगारांना मनोज भाऊ चौधरी यांनी नाश्ता चहापाणी केला व कार्यक्रमाची सांगता केली.
कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार केल्यामुळे श्री मनोज भाऊ चौधरी यांचे दहिवेल गावातून व परिसरातून कौतुक करण्यात आले.