अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी
10 एप्रिल ला बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बे मोसमी पाऊस, वादळ, वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची Eknath shinde-एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्री मंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही देऊन श्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने आपापल्या शेत - शिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसेष बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन्, निताणेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.