आज दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी जि प शाळा तेलमवाडी ता इगतपुरी येथे शिवा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्याकडून शैक्षणिक साहित्य व अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून शिधा वाटप करण्यात आला.शिवा चॅरि्टेबल ट्रस्ट चे सदस्य श्री श्यामभाऊ चांडक व श्री रवीभाऊ कासट च्या सहकार्याने आजची सेवा घडून आली. अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांना अंकलिपी वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर , पट्टी, वाढते ऊन पाहता चप्पल व खाऊचे वाटप करण्यात आले. वाडीतील सर्व कुटुंबियांना सण गोड व्हावा या उद्देशाने शिधा वाटप करण्यात आला.
गरजू लाभार्थाना चप्पल व सर्वाना मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले . याप्रसंगी कुर्णोली तेलमवाडी गावाचे सरपंच सौ. शाळूबाई बाळू तेलम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कमळू तेलम, अंगणवाडी सेविका जयवंताबाई तेलम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. श्री केशव गावित सर हिवाळी, घनश्याम कोळी सर डहाळेवाडी आणि कमलाकर घरटे पिंपळगाव भटाटा यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी जि प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम शारदा सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. व आभार व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती तेलमवाडी, ग्रामस्थ तेलमवाडी यांच्याकडून शिवा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांना मनापासून धन्यवाद आशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली