टाईम्स पब्लिक स्कूल, उदगीर येथे समर कॅम्प संपन्न



प्रतिनिधी / उदगीर 

          टाईम्स पब्लिक स्कूल, उदगीर येथील शाळेमध्ये दि.18/4/2023 ते 24/4/2023 या कालावधीत 'समर कॅम्पचे' आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री.ईश्वरप्रसाद बाहेती, सचिव श्री.विजयकुमार कपीकेरे, कोषाध्यक्षा सौ.मंगला कपिकेरे मॅडम यांच्या शुभहस्ते या "समर कॅम्पचे "उद्घाटन झाले. या शिबिरामध्ये योगा व विविध खेळाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. या शिबिराचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होय.                               या शिबिराचे आयोजन टाइम्स पब्लिक स्कूल ने केले होते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दासरवाड सर, अँड. बेदाडे सर ,सौ स्वामी मॅडम, डॉ.नरेंद्र शिंदे सर, श्री.कपिकेरे विरभद्र या योग प्रशिक्षक गुरुंनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना योग व शरीर याचा अनुबंध सांगून प्रात्यक्षिक करून घेतली.                    या शिबिराची सांगता" सायकल रॅलीने" अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात पूर्ण झाली. या रॅलीसाठी प्रमुख पाहुणे डॉ. विवेक होळसंबरे, श्री. मुकेश निरुणे, श्री.गोविंद रंगवाळ यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना मार्गदर्शन करत 'शाळेपासून' ते 'साईधाम' पर्यंत ही सायकल रॅली यशस्वीरित्यापूर्ण केली.              या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठा सहभाग नोंदवला. टाइम्सच्या समर कॅम्प साठी ज्यांनी प्रत्यक्ष व प्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार शाळेचे प्रिन्सिपल नळगीरकर यांनी मानले