सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
२३ जुलै २०२१ ची ती रात्र.....वादळीवार्यासह मुसळधार कोसळणारा पाऊस....आणी निसर्गाने दाखविलेल्या रौद्ररुपाने सात संसार क्षणात उद्ध्वस्त झाले...नेते, प्रशासनाने भेटी दिल्या आश्वासने दिली....मात्र, दोन वर्ष झाली तरी दरडग्रस्त हक्काच्या घरासाठी उपेक्षितच आहेत.
या दुर्घटनेत पोसरे बौद्धवाडी येथील सात घरांवर डोंगराचा भाग कोसळून दोन चिमुकल्यांसह १७ जण मातीच्या ढिगार्याखाली गाढले गेले. तब्बल सहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देवून पूनर्वसनासह मदतीचे आश्वासन दिले. आर्थिक मदत तर मिळाली पण हक्काच्या घराच काय?
आज हि कुटुंब चिपळून तालुक्यातील अलोरे येथे आसर्याला आहेत. आज शासन जमीन द्या घर देतो अशी भूमीका घेत असल्याने शासनाच्या उदासिन धोरणामुळे हि कुटुंब निर्वासितांचे जीवन जगत आहेत.