जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी



    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस सावरगावचे प्रथम नागरिक माननीय सौ हिराबाई बाबाजी कुशारे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री बाबाजी विश्वनाथ कुशारे पिंपळगाव बसवंत चे मार्केटचे सभापती माननीय श्री राजेश जी पाटील त्यांच्यासमवेत आलेले गडाख आमच्या शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री ताकाटे सर आणि सावरगाव चे सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते यावेळेस ताकाटे सरांनी विद्यार्थ्यांना बाब बाळासाहेब आंबेडकरांचे आचरण प्रत्यक्ष जीवनात कसे उतरावे याविषयी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सुनील मरगू चौगुले यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे खरे मित्र हे पुस्तक होते 

    विद्यार्थ्यांनी जीवनात आपला खरा मित्र पुस्तकालाच करून ज्ञान कसं संपादन करता येईल आणि आपल्या भावी आयुष्यात आपण कसे यशस्वी होऊ याविषयी सखोल मार्गदर्शन केले याप्रसंगी आंबेडकरांच्या जीवनात आधारित इंग्लंडमधील एक प्रसंग सांगितला यातून एकच बोध घेण्यात यावा की कोणतेही कार्य करत असताना मनापासून केले तर ते कार्ययशस्वी होते त्याचप्रमाणे गावचे प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री बाबाजी कुशारे यांनीही विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले 

    अंगात शिस्त असेल तर सर्व गोष्टी आपल्याला सहज करता येतात विद्यार्थ्यांनी मोबाईलला आपला मित्रांना मानता पुस्तकांना आपला मित्र मानलं तर सर्व गोष्टी सहज शक्य होऊ शकतात असे अनमोल विचार विद्यात्यांसमोर बाबाजी कुशारे यांनी मांडले इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांनी इंग्लिश हिंदी मराठी या भाषेमधून उत्कृष्टपणे भाषण केले सूत्रसंचालन शाळेचे प्रभारी केंद्रप्रमुख माननीय श्री अमोल जी झोले अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी सूत्रसंचालन केले शेवटी आभार व समारोप केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री अमोल जी झोले सर यांनी केले