प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी
ओझर -: डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद हे सण उत्साहात साजरे करा उत्सव काळात शांतता बाळगा उत्साहाला गालबोट लागणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करा गोंधळ घालणारे वाद करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी दिला ओझर पोलीस ठाण्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पोलीस उपनिरीक्षक गणपत जाधव बालकदास बैरागी आदि उपस्थित होते
याप्रसंगी भोसले यांनी समाजकंटक समाजमाध्यमांवर कोणत्याही महापुरुषांविषयी चुकीच्या पोस्ट व्हायरल करता त्याचे त्वरित पडसाद उमटतात अशा पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस खात्याची करडी नजर असुन त्यांच्या वर देखील पोलीस कडक कारवाई करतील महापुरूषांच्या मिरवणुकीत मद्य पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यां लक्ष ठेवावे उत्सव काळात लाईट जाणार नाही तसेच मिरवणूक मार्गांतील अडथळे नगरपरिषद प्रशासनाने त्वरित हटवावे अशा सुचना भोसले यांनी दिल्या .
या प्रसंगी माजी सरपंच प्रदीप अहिरे आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव माजी उपसरपंच प्रकाश महाले धमेंद्र जाधव आदिंनी आपल्या मनोगतात उत्सव शांततेत पार पाडण्याची ग्वाही दिली या बैठकीस माजी सरपंच हेमंत जाधव प्रशांत पगार नितीन काळे कामेश शिंदे ओमको संचालक रउफ पटेल राकेश जाधव विनोद विधाते विपीन जाधव राजु भडके प्रशांत अक्कर सुरज शेलार कांचन जाधव भावेश मंडलिक प्रदिप मंडलिक घनश्याम जाधव चिराग मुलानी ओझर पोलीस ठाण्याचे दिपक गुंजाळ अनुपम जाधव जितेंद्र बागुल बंडु हेंगडे किशोर अहिरराव कारंडे पाटील आदि उपस्थित होते.
फोटो-: ओझर पोलीस ठाण्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले समावेश पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पोलीस उपनिरीक्षक गणपत जाधव बालकदास बैरागी रवींद्र जाधव.