अनिकेत मशिदकर प्रतिनिधी, मालेगाव
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश - नवी मुंबई विभागातर्फे ५वे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन दिनांक १६/०४/२०२३ रोजी गोवंडी स्टेशन मनपा मराठी शाळा सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता सुरू होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक, इतिहास संशोधक, सिने दिग्दर्शक, संगीतकार श्री शरद मधुकर गोरे यांच्या शुभहस्ते होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिका, वास्तूतज्ञ, निसर्गोपचार तज्ञ सौ. राजश्री नीरज बोहरा यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षदी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, सुप्रसिद्ध कवयित्री सौ. जान्हवी कुंभारकर यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनास मुंबईच्या माजी महापौर श्रीमती स्नेहल अंबेकर, मुंबईचे माजी नगरपाल डॉ.जगन्नाथ हेगडे विशेष मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राम नेमाडे, दैनिक प्रहार वृत्तपत्र संपादक श्री सुकृत खांडेकर इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे आयोजन संस्थेच्या नवी मुंबई जिल्हा विभागाने केले असून कवयित्री मनिषा साळवे (उपाध्यक्षा) व कवयित्री उषा राऊत (सरचिटणीस ) या सूत्रसंचालन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक श्री शशिकांत सावंत ( मुंबई प्रदेश संघटक) व कवी श्री भारत घेरे (कार्याध्यक्ष ) हे कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रस्थापित व नवकवी हजेरी लावणार असून सौ. अनिता गुजर, सौ. मुग्धा कुंटे, सौ. राधिका बापट, श्री अविनाश ठाकूर, श्री नवनाथ ठाकूर, श्रीमती रतन याडकिकर, श्री हरिश्चंद्र दळवी, श्री जयंत पाटील, श्री राजेन्द्र पाटील, श्री संदीप पाटील, सौ. शोभा गायकवाड, सौ. अंजली पखले, सौ. सरिता चव्हाण, श्री सुनील पवार, श्री अमोल कुंभार, श्री नामदेव राठोड, श्री दिपक नागरे, श्री मंगेश म्हात्रे, श्री उदय क्षीरसागर इत्यादी अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक संमेलनाची विशेष शोभा वाढवणार आहेत. \उद्घाटन, दीप प्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार, मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्यांचे सादरीकरण, परिसंवाद, पुरस्कार वितरण मान्यवरांचे व उपस्थितांचे काव्यसंमेलन असा एकदिवसीय भरगच्च सोहळा संपन्न होणार असून हे संमेलन सर्वांसाठी खुले आहे. साहित्य रसिकांनी या साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई प्रदेश अध्यक्ष सौ. राजश्री बोहरा यांनी केले आहे.