प्रविण चौरे ओझर प्रतिनिधी
ओझर : ओझर सह परिसराची महत्वपूर्ण आर्थिक वाहिनी असलेल्या दि ओझर मर्चंट को ऑप बँकेला नुकत्याच ३१ मार्च रोजी संपलेल्या आथिर्क वर्षात ३ कोटी ७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झालेला असून रिझर्व्ह बँकेच्या तरतुदी वजा जाता निव्वळ नफा हा १ कोटी ५ लाख रु झालेला आहे.गेल्या ५ वर्षातील हा उच्चांकी नफा असून त्या बद्दलसभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.नवनियुक्त संचालक मंडळाने कारभार हातात घेतला नंतर बँकेची स्थिती भक्कम करतांना कर्जवसुली करण्यावर भर दिला.या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १०७ कोटी ६ लाख असून कर्जवाटप रु ६९ कोटी ७५ लाख असून सीडी रेशो ६४.८२% इतका आहे.ठेवींच्या रकमेत वाढ तसेच थकबाकी चे प्रमाण कमी करण्यासाठी संचालक मंडळासह कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहे.बँकेचे चालु वर्षी सभासद १०६३२ इतकी असून गतवर्षीपेक्षा ३४ ने वाढ झालेली असून बँकेचे वसूल भागभांडवल ४ कोटी ८ लाख इतके असून स्वनिधी २० कोटी ३२ लाख असुन गुंतवणूक ५२ कोटी ८५ लाख इतके आहे.
ठेव रकमेत वाढ होणेसाठी संचालक मंडळ अधिकारी व सेवक वर्ग प्रयत्नशील आहे. चालु वर्षी बँकेचा एनपीए नेट ७.१५ टक्के इतका झालेला असुन मागील वर्षी पेक्षा तो १.४२ टक्याने कमी झालेला आहे. एनपीए ३ टक्के पेक्षा कमी होणेसाठी सर्व संचालक मंडळ व अधिकारी, सेवक यांनी अटोकाट प्रयत्न केले. चालु वर्षी एनपीए कमी करणेसाठी संचालक मंडळ सुरूवातीपासुनच कसोशिने प्रयत्नशिल राहणार आहे.
बँकेच्या सध्यस्थितीत मुख्य कार्यालयासह एकुण ओझर,नाशिक,पिंपळगाव, जानोरी,कसबे सुकेणे,सिन्नर,दिंडोरी या ठिकाणी ७ शाखा व ओझर मध्येच विस्तारीत कक्षासह बँकेचे कामकाज चालु आहे.
या पत्रकार परिषदेस संचालक सर्वश्री.अध्यक्ष राजेंद्र शिंदे,उपाध्यक्ष प्रवीण लढ्ढा,जनसंपर्क संचालिका सौ मंगल कदम,भालचंद्र कासार,रविंद्र भट्टड,विजय शिंदे,भारत पल्हाळ,लक्ष्मण सोनवणे,नंदलाल चोपडा,योगेश चांडक,प्रविण वाघ,रउफ पटेल,शरद सिन्नरकर,निळकंठ कदम,श्रीकांत कदम,गणेश बोरस्ते,सौ. जिजाबाई रास्कर,डॉ.सौ.मेघा पाटील,श्रीमती ज्योती भट्टड,तज्ञ संचालक भारत आहेर,महेश गाडगे,कार्यलक्षी संचालक अरुण पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर शिंदे, महाव्यवस्थापक दिनकर पुंड, मनसुखलाल छाजेंड,मुख्य लेखापाल अनिल दिवटे व अधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
२५ नोव्हेंबर २०२२ मध्ये पदभार स्वीकारल्या नंतर वाढलेला एन पी ए कमी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाला सोबत घेतले.आर्थिक घडी बसवतांना ओझर मर्चंट को ऑप बँकेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न असेल. राजेंद्र शिंदे अध्यक्ष दि ओझर मर्चंट को ऑप बँक,ओझर