प्रतिनिधी :--मारुती जिनके
२७एप्रिल रोजी दुपारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह काही भागात गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला ज्वारी, व फळपिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
२७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह कंधारेवाडी ,फुलवळ ,अंबुलगा बीजेवाडी, काही भागात गारपीट झाली. वादळाचा वेग प्रचंड होता. अवकाळी पावसामुळे शेतकरी व शेतमजूरांची एकच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. अनेक घरांची अंशतः हानी झाली.
तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बालाजी नागोराव केंद्रे यांच्या शेतातील एक एकर शेतामध्ये टोमॅटोची भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . व बरेच शेतकऱ्याचे ज्वारीची नासाडी झाली आहे. आंब्याच्या झाडाची फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली.
संसारोपयोगी साहित्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून व आडवे पडले. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता.
शासन व प्रशासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी.