अनिकेत मशिदकर प्रतिनिधी, मालेगाव
काल दि 9 एप्रिल ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाऊन शरयू तीरावर महाआरती केली. त्याचेच अवचित्य साधून नाशिकचे शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येला जाऊ न शकल्याने त्यांनीही त्याचवेळी (सायंकाळी) नाशिक मधील रामकुंडावर गोदावरीची महाआरती केली. यावेळी जय श्रीराम च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेले दिसून आले.
याप्रसंगी सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, श्याम कुमार साबळे, दिगंबर मोगरे, युवा सेना जिल्हा विस्तारक विलास बेलदार, माजी नगरसेविका संगीता जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, युवा सेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, मध्या नाशिक विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, युवा सेना जिल्हा समन्वयक राहुल वारुळे, वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख योगेश मस्के यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाऊन राम लल्ला चे दर्शन घेतले व राम मंदिराच्या उभारणीचे माहिती घेतली त्यानंतर शरयू नदीची महाआरती करण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री ना दादासाहेब भुसे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.