भरणेतील "त्या" बांधकामाला तहसिलदारांची स्थगीती; दै.कर्णधार च्या बातमीचा ईफेक्ट


सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
     मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे धोकादायक अनधीकृत बांधकामाला अखेर येथील तहसिलदारांनी स्थगिती दिली असून बांधकामाबाबतचे संंबधीत आधिकार्याःच्या परवानग्या सादर करण्याचे लेखी आदेश सुजित फागे यांना दिले आहेत. याबाबतचे वृत्त दै. कर्णधार ने २० रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत हि कारवाई करण्यात आली.

           हे  बांधकामा करणार्या सुजीत फागे यांच्या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत खोपकर यांनी कोकण आयुतांकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच डाॕ. विलास शेळके यांनीहि याबाबतची लेखी तक्रात तहसिलदार तसेच पोलीस निरिक्षकांकडे केली होती.

       शासकिय कर्मचारी असणारे श्री. फागे यांनी मालमत्ता हडप करण्याच्या हेतूनेच शासकिय संपादित ईमारत पाडून व्यापारी गाळे उभारण्याचा घाट घतला आहे. या बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित फागे यांची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

      तसेच १ मे पूर्वी कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र दिनीच आयुक्त कार्यालयासमोरच उपोषण छेडणार असल्याचे श्री. खोपकर यांनी तक्रारीत म्हटले होते.