खेड आगारातून शिर्डी, छ.संभाजीनगर बससेवा



सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी   

     येथील खेड आगाराकडून उन्हाळी सुट्टी निम्मित गावी आणि दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशी आणि विद्यार्थ्यांसाठी  खेड शिर्डी आणि खेड छत्रपती संभाजी नगर या बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

            आगाराकडून प्रती वर्षी उन्हाळी सुट्टी निमित्त जादा वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात येते. यापूर्वी सकाळी ०६:३० वाजता खेड तुळशी विन्हेरे मार्गे बोरीवली आणि खेड तुळशी विन्हेरे मार्गे विरार या दोन्ही बस सुरु करण्यात आल्या आहेत. तर शालेय सुट्ट्या लक्षात घेऊन खेड मधील अनेक प्रवाशांच्या मागणीनुसार खेड शिर्डी हि बस सुरु करण्यात येणार आहे. हि बस सेवा साधी असणार आहे. सकाळी ०८:३० वाजता खेड वरून सुटेल तर शिर्डी वरून दुसर्या दिवशी सकाळी ०८:३० ला शिर्डी वरून खेड कडे निघेल बस भरणा नाका, नातुनगर, कशेडी, पोलादपूर, महाड, माणगाव, ताम्हिणी, स्वारगेट, भोसरी, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, राहता मार्गे शिर्डी ला जाईल.   

           खेड छत्रपती संभाजीनगर  हि सेवा स्लीपर सीटर आहे हि बस खेड वरून दुपारी १३: ३० वाजता सुटेल आणि छत्रपती संभाजी नगर वरून दुपारी १५:३० वाजता सुटेल, हि बस भरणे नाका, खवटी, कशेडी, पोलादपूर, महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, स्वारगेट, नगर मार्गे जाईल. या दोन्ही बस आरक्षण खिडकीवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड आगर आणि कोकण एसटी प्रेमी यांच्या कडून करण्यात आले आहे