संत मुक्ताबाई विद्यालयात मुख्याध्यापक भारत कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

 


 किरण माने इंदापूर प्रतिनिधी 

      शनिवार,दिनांक 15 एप्रिल रोजी रयत शिक्षण संस्थेचे, श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव या ठिकाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भारत लक्ष्मण कांबळे सर यांचा सेवापुर्ती  समारंभ साजरा झाला. आपल्या आयुष्याची 34 वर्ष कांबळे सरांनी रयत शिक्षण संस्थेची सेवा केली. या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे उपस्थित होते दत्तात्रय भरणे म्हणाले की  प्रत्येकाने आपले कुटुंब  प्रेम कायमस्वरूपी टिकवावे. आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असेही दत्तात्रय भरणे मामा म्हणाले....

 यावेळी अनेक मान्यवरांनी  मनोगत व्यक्त केले त्यामध्ये छत्रपती साखर कारखान्याचे संचालक  ॲडव्होकेट  लक्ष्मणरावजी (आबा )शिंगाडे , शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट नितीन कदम,   स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष व  कार्यक्रमाचे अध्यक्ष  साहेबराव भाऊ  शिंगाडे ,ज्येष्ठ सदस्य भागवत भाऊ भूजबळ, घाडगे गुरुजी,वैभव भोंग सर , कुमारी सिद्धी जाधव  आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले....

 याप्रसंगी मुख्याध्यापक कांबळे सर म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमध्ये अगदी प्रामाणिकपणे सेवा केली. कोणाचेही मन दुखावले नाही. सर्व सेवकांचे सहकार्य चांगले मिळाले.. शेळगाव मधील स्थानिक स्कूल कमिटीने कधीही माझे विचार, निर्णय डावले नाही.. माझ्या सुखी जीवनामध्ये माझ्या पत्नीने मला  चांगली साथ दिली. तसेच आम्हा तीनही भावंडांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे म्हणून जुन्या काळामध्ये सुद्धा चांगले प्रयत्न केले. असे चांगल्या पदावर  आहोत.

यावेळी  सरपंच रामदास आप्पा शिंगाडे, पोलीस पाटील यल्लाप्पा वाघमोडे  जलभूषण पुरस्कार विजेते भजनदास पवार सर, राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव जी शिंगाडे प्रतापसिंह चवरे, केंद्रप्रमुख  मारुती  सुपुते साहेब, गुरव सर, झेंडे सर, मोरे सर लोणकर सर, छगन  साबळे सर, आर.डी. पांडव सर उपस्थित होते.. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रथम थाळीफेक स्पर्धेमध्ये सुनील वाघमोडे  खेळाडूचा आणि आर टी एस  व एन एम एम एस व मंथन मध्ये  आलेल्या विद्यार्थ्यांचा माजी राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत सत्कार पर्यवेक्षक रमेश लोंढे सर, कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनाजी मोरे सर, अजिनाथ मारकड सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी अभंग व प्रवीण सुरवसे सर यांनी केले.