घेतांना आज निरोप शाळेचा, आले भरूनिया डोळे. शाळेतील दिवस बनले, स्मरणाच्या पुस्तकातील पाने
आज जि प सेमी इंग्रजी उच्च प्राथ. शाळा बोरटेंभे येथे इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
इयत्ता 8 वी च्या युवराज, वैभव, साक्षी, जानवी, प्रमिला, गौरी यांनी शाळा व शिक्षकांविषयीच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. पूनमने कवितेतून आजी माजी शिक्षकांबाबत आठवणी सांगितल्या. शितलने प्रास्ताविकाद्वारे इ. ८ वी च्या सर्व विद्यार्थी व वर्गशिक्षकाबाबत सुंदर अशी माहिती दिली. प्रमुख पाहुणे सिनी. शिक्षण विस्तार अधिकारी मा. अशोकजी मुंढे साहेब यांनी ८ वीच्या सर्वच विद्यार्थ्यांचे, वर्गशिक्षक माणिक भालेराव सरांचे विशेष कौतुक केले तसेच इतर शिक्षक व पालकांचे देखील कौतुक करून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. श्री. जनार्दन कडवे सरांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले शिस्तीचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. श्री. अतुल आहिरे सरांनी विद्यार्थ्यांसोबतच्या सुंदर आठवणी सर्वांसोबत शेअर केल्या. श्री. माणिक भालेराव सरांनी ८ वीच्या विद्यार्थ्यांसोबतचा इ.१ली ते ८वी आठ वर्षाचा वर्गशिक्षक म्हणून असलेला शैक्षणिक प्रवासाचे सुंदर शब्दात वर्णन करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. श्री. घोडे सर, श्री. सोनवणे सर, सौ. भारंबे मॅडम, बुवा मॅडम, महाजन मॅडम, श्रीवंत सर, यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबीचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन ८ वीच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थिनी काजल हिने केले तर उपस्थित सर्वांचे आभार ओमकार ए. याने मानले.
याप्रसंगी वर्गशिक्षक श्री. माणिक भालेराव सर यांचेकडून ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान केले व ८ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गशिक्षक भालेराव सरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे औक्षण करून त्यांना पेन, रुमाल व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनूभाऊ आडोळे, उपाध्यक्ष गुरुनाथभाऊ आतकरी, सदस्य भानुदासभाऊ आडोळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मागासवर्गीय शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष संतोष श्रीवंत सर, पदवीधर शिक्षक संघटना तालुका सरचिटणीस अतुल आहिरे सर व शाळेतील सर्व शिक्षक वृंद पाटील सर, कडवे सर, घोडे सर, भारंबे मॅडम, भालेराव सर, बुवा मॅडम, महाजन मॅडम, सोनवणे सर त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इ. ८ वीच्या शंकर, ओमकार डी., अथर्व, भूषण, संतोष, ओमकार एल., कुणाल, विवेक, विघ्नेश, ओमकार एस., दिव्या, वृषाली तसेच कल्पनाताई आरशेंडे, इंदीराताई नवले व इतर सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. उत्कृष्ट असा निरोप समारंभाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्वच मान्यवरांनी इयत्ता ८ वीच्या वर्गाचे अभिनंदन केले. व्हेज पुलाव, गोड शिरा असे सुग्रास भोजनाचा उपस्थित सर्वानीच आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली