ता. इगतपूरी दि.20/4/2023 रोजी जि.प. शाळा कोरपगांव येथे शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण पार पडले. प्रथमतः प्रार्थनेने मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक आदरणीय केंद्र प्रमुख श्री. आर . ओ. पाटील सर यांनी पार पाडले. आपल्या जवळ बसलेल्या सर्व शिक्षकांनी आपत्या शिक्षक मित्रांची ओळख करून दिली. यात अंगणवाडी सेविकांचाही प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षणाचा उद्देश काय?
आपणास शाळास्तरावर काय तयारी करावयाची आहे? यामागील शासनाची भूमिका काय ? स्टॉलची रचना कशी असावी? नोंदी कशा घ्याव्यात? मागील मेळाव्याची फलनिष्पत्ती काय राहिली? नवीन बदल म्हणून क्यू आर कोडचा असलेला सामावेश कसा? याबाबत चे सविस्तर विवेचन तथा माहिती सादरीकरण तज्ञ मार्गदर्शक श्री. संतोष शिरसाठ सर व श्री अशोक भुसारे सर यांनी केले.
शाळापूर्व तयारीची प्रचार फेरी घेण्यात आली. घोषणा देण्यात आल्यात.यानंतर पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याची स्टॉल नुसार प्रात्यक्षिक रुपात कृती करून नोंदी घेण्यात आल्या.यात विद्यार्थ्यासह पालक, लीडर माता उपस्थित राहिल्या.प्रशिक्षण देणारे उदयोन्मुख तज्ञ मार्गदर्शक श्री. अशोक भुसारे सर व संतोष शिरसाठ सर यांनी प्रशिक्षण खूपच छान व मनापासून दिले. दोघानीही चांगली तयारी केल्याचे लक्षात येत होते.त्यांचे खरोखरच अभिनंदन व कौतुक प्रशिक्षणानंतर तज्ञ मार्गादर्शकाचे आभार श्री. रविंद्र पाटील सर यांनी आपल्या शैलीत मानले.आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोईर सर व टीमचे सहकार्याबद्दल धन्यवाद पुढील शाळास्तर मेळाव्यासाठी सर्वांना शुभेच्छा आशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली