कुणबी युवा मेळाव्या निमित्ताने गावोगावी जोरदार प्रचार प्रसार सुरू



प्रतिनिधी - रमेश करंजे (तळा)

  कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका तळा संलग्न कुणबी युवा तळा यांच्या वतीने ७ वा वर्धापनदिन सोहळा सायंकाळी ५ वाजता गो. म. वेदक हायस्कूल समोरील मैदानात आयोजित करण्यात आले आहे. त्या संदर्भात कुणबी युवाच्या वतीने गावोगावी बॅनर लावून प्रचार प्रसार होत आहे. कुणबी युवाचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करून निमंत्रण देऊन समाजात जनजागृती करण्यात येत आहे.सर्व समाज बांधवांचा उत्कृष्ट प्रतिसाद पाहता सर्वांना आतुरता आहे ती युवा मेळाव्याची..