हनुमान मंदिर दहावा वर्धापन दिन सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह



 प्रतिनिधी लोहा रामकिशन कदम 

    आज डोनवाडा ता. लोहा येथे हनुमान मंदिर दहावा वर्धापन दिन सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब उपस्थित राहून सर्वप्रथम दर्शन घेतले यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सप्ताह समाप्तीच्या शुभेच्छा देत गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

     याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच भगवान घोडके, उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, माजी सरपंच बालाजी कदम, माजी सरपंच बालाजी जाधव, रामराव कदम, भगवान कदम,सुभाष हिवरे, सुनील मोरे, दतराम पोलीस पाटील, पांडुरंग शिंदे, मारुती शिंदे, माधव कदम, चेअरमन रमेश मोरे, कोंडीबा कदम,नागोराव जाधव, विश्वंभर जाधव, व्यंकटी कदम, शेषराव जाधव, गंगाधर जाधव सह कार्यकर्ते गावकरी व महिला मंडळ उपस्थित होते त्याप्रसंगी.!!!