जनतेने प्रत्येक उत्सव गुण्यागोविंदाने साजरा केला पाहिजे - जिपोअ सारंग आव्हाड

  


मलकापूर: राज्य किंवा केंद्रातील राजकीय उलथापालथ सामाजिक परिणाम घेऊन येते.त्यामुळे जनतेने सतर्कता बाळगली पाहिजे.सण किंवा उत्सव प्रशासनाचे नाहीत तर जनतेचे आहेत हे लक्षात घेवून गुण्यागोविंदाने साजरे केले पाहिजे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी केले.

  येथील पोलिस ठाण्यात आज मंगळवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीच आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना आव्हाड यांनी,येणारा काळ कठीण असल्याचे सांगितले.व त्यासाठी तयार राहण्याच आवाहन त्यांनी केले.

 या बैठकीत समतेचे निळे वादळ संघटनेचे अध्यक्ष भाई अशांत वानखेडे, काँग्रेसचे नेते रशिदखा जमादार,एसडीओ मनोज देशमुख, तहसीलदार राजेश सुरडकर व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आदींनी समायोचीत विचार व्यक्त केले.

 व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष अँड हरिश रावळ, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी, शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी उपस्थित होते.सूत्रसंचालन रविंद्रसिंह राजपूत यांनी तर आभारप्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक लहू तावरे यांनी केले.

अप्पर पोलीस अधीक्षकांचा निर्वाणीचा इशारा..!

शासनदरबारी एकेकाळी संवेदनशील असलेल्या मलकापूरची ओळख पुसेल अशा घडामोडी घडल्या.  शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील्याने वेगळी ओळख निर्माण झाली.परंतू गत काही दिवसांत समाज विघातक घडामोडीची शक्यता वर्तवली जात आहे.त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे.