प्रतिनिधी :- मारुती जिंके
कंधार--- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने अक्षय तृतिया दिनी क्रांतिसूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९२ व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात २२ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक व जाहीर कार्यक्रम होणार आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार असून ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालय, चिखलवाडी कॉर्नर, जुना मोंढा ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचणार आहे. ढोल-ताशा, भजनी मंडळे, देखावे यांसह हजारो लोक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. तद्नंतर सायंकाळी ७ वाजता महात्मा बसवेश्वर पुतळ्यासमोर भव्य जाहीर कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे हे राहणार असून गुरूपदेश करण्यासाठी गुरूवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, गुरूवर्य गुरूपादेश्वर महाराज गिरगावकर, गुरूवर्य डॉ. सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, आचार्य गुरूराज स्वामी यांचे आशीर्वचन लाभणार आहे.उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष बालाजी ईबितदार, उत्सव समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, कार्याध्यक्ष वीरभद्र बसापुरे तर प्रमुख पाहुणे म्हणूनआ. राम पाटील रातोळीकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजीराव कल्याणकर,राज्य सल्लागार डॉ. गोविंद नांदेडे, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. अनिल माळगे उपस्थित राहणार आहेत.
या भव्य मिरवणुकीस व समारोपीय कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुढ्डे, शंकरराव पत्रे, दिगंबरराव मांजरमकर, नंदु देवणे, शुभम घोडके, सत्यभामा एजगे, नंदाताई पाटील, सिद्धेश्वर स्वामी जवळेकर, महानगर अध्यक्ष नंदू देवणे, शहरप्रमुख शिवराज उमाटे, शहरप्रमुख विजय हिंगमिरे यांच्यासह महात्मा बसवेश्वर उत्सव समितीचे पदाधिकारी व शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल कसबे,जी.एस.मंगनाळे, विश्वनाथ देशमुख, पंढरीनाथ बोकारे,माधव भालेराव, शिवराज बिचेवार,प्रा.रामकिशन पालिमकर, देवीदास डांगे, संगमेश्वर बाचे , शेषेराव कंधारे आदींनी केले आहे.