विकासाची गंगा वाहणार-माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे प्रतिपादन



सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 

       राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी राज्याचा विशेषतः ग्रामीण भागात राहणार्या जनतेच्या सर्वागिण विकासाचा विडाच उचलला असून येत्या काळात राज्यात विकासाची गंगाच वाहणार असल्याचे प्रतिपादन माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले.

    ते खेड (रत्नागिरी ) खवटी येथील जलजीवन मीशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या भुमिपुजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते. खवटी येथील ३ कोटी ७ लाख व खवटी-पाखरवाडी ३८ लाख ५१ हजाराच्या नळपाणी योजनांचे भुमिपूजन कदम याःच्या हस्ते करण्यात आले. ते पुढे म्हणाले, विद्यमान आमदार योगेश कदम पदाला साजेस समाजकार्य करत असून सर्वसामान्यांच्या मुलभुत सुविधा सोडविण्यासाठी सतत पाठपूरावा करत असल्याचे गौरवोद्गार काढत आपण त्याःच्या संपर्कात राहून आपल्या गावाचा सर्वागीन विकास साधण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसःगी आमदार योगेश कदम, सरपंच शर्मिला दळवी, उपसपंच शैलेश दळवी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.