अँग्रीस्टॅक कार्डसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन

 



श्रीक्षेत्र माहूर प्रविण बरडे 

शेतकऱ्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ॲग्री स्टॅक कार्ड साठी सेतू सुविधा केंद्र किंवा इतर कोणीही पैशाची मागणी केल्यास पुराव्यासह थेट तक्रार करा तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे 

माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी प्रेस नोट जाहीर करून नागरिक शेतकऱ्यांना आवाहन केले की ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शासनाकडून कोणतेही अधिकृत कार्ड जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे अॅग्रीस्टॅक कार्ड देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने किंवा सेतू केंद्राने नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करणे अधिकृत नाही.

अॅग्रीस्टॅक प्रणालीमध्ये शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारा फार्मर रजिस्ट्री क्रमांक अॅग्रीस्टॅक क्रमांक हाच शासनमान्य व ग्राह्य क्रमांक आहे. यासाठी कोणत्याही स्वतंत्र कार्डची आवश्यकता नाही.

जर कोणतेही सेतू केंद्र किंवा इतर कोणतीही व्यक्ती अॅग्रीस्टॅक कार्ड काढून देण्याच्या नावाखाली कोणतीही रक्कम आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासाठी त्याबाबतची तक्रार पुराव्यासह तहसील कार्यालय, माहूर येथे तात्काळ दाखल करावी त्यांचे वर लगेच कारवाई करण्यात येईल

सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही अनधिकृत मागणीस बळी पडू नये तसेच शासनाच्या अधिकृत सूचना व मार्गदर्शक तत्त्वांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप तहसील कार्यालय, माहूर यांच्या वतीने करण्यात आले आहे